
पाथर्डी | तालुका प्रतिनिधी
कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे या मागणीसाठी आ.निलेश लंके यांनी सुरु केलेले आंदोलन आक्रमक पवित्रा घेत असून...
आज दुपारी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय कार्यालयातील उपअभियंता यांची खुर्ची अज्ञात व्यक्तीने कार्यालयाच्या बाहेर काढून पेट्रोल टाकून जाळली आली असून या घटनेमुळे आता या आंदोलनाला हिंसक वळण लागायला सुरुवात झाली.
गेल्या अनेक वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे.हे काम लवकरात लवकर सुरूहोऊन पूर्ण व्हावे या प्रमुख मागणीसाठी आमदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषन सुरू आहे.
भाजप वगळता सर्वच पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तीन दिवस सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. आज राष्ट्रीय महामार्गाच्या पाथर्डी येथील उपविभागीय कार्यालयातील उपअभियंता यांची खुर्ची अज्ञातांकडून बाहेर काढून पेट्रोल टाकून जाळण्यात आली. पोलिसांनी घटनस्थळी तातडीने धाव घेत अज्ञात व्यक्तीचा कसून शोध सुरू आहे.