अगस्ति साखर कारखाना निवडणूक : एकाची उमेदवारी, 44 अर्ज नेले

अगस्ति साखर कारखाना निवडणूक : एकाची उमेदवारी, 44 अर्ज नेले

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी विकास कचरू शेटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला तर 44 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

उमेदवारी दाखल करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदत असून माघारीची अंतिम तारीख 6 जुलै असल्याने यादिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी सत्ताधार्‍यांसह अन्य इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com