कृषी समृद्धी केद्रांबाबत शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची अधिकार्‍यांशी चर्चा

कृषी समृद्धी केद्रांबाबत शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची अधिकार्‍यांशी चर्चा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

नागपूर मुंबई या नियोजित समृध्दी महामार्गावर बांधण्यात येणार्‍या धोत्रे या कृषी समृध्दी केंद्राशी (नवघर) संबंधित असलेल्या

गोदावरी नदीकाठच्या लाखगंगा, बापतरा, पुरणगाव तसेच धोत्रे या गावातील मोजक्या लाभार्थी शेतकर्‍यांनी कृषी समृध्दी केंद्राबाबद असलेल्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिर्डी येथे अधिकार्‍यासमवेत बैठक संपन्न झाली.

यावेळी या समृध्दी महामार्गाचे मुख्य प्रशासक कमलाकर फड भूमी अभिलेख अधिकारी डॉ भारत बस्ते फडकोपरगावचे तहसीलदार योगेशचंद्रे अधिकारी उपस्थित होते समृध्दी महामार्गाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस हे मागीत आठवडयात शिर्डी येथे आले असता त्यांची शेतकर्‍यांनी विमानतळावर भेट घेऊन धोत्रे येथील नियोजित कृषी समृध्दीकेंद्रांचे काम प्राधान्याने करावी अशी मागणी केली होती.

त्याबाबदल क्ष घालण्याचे आश्वासन ना . फडवणीस यांनी दिले होते व अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार अधिकार्‍यांनी तातडीने बैठक घेतल्याचे समजते नियोजित समृध्दी महामार्गावर 19 कृषी समृध्दीकेंद्रे निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी 8 केद्रांची कामे मे2021पासून सुरु होणार आहेत त्यामध्ये धोत्रे केंद्राचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकरी वर्गाची आहे.

तसेच एकरकमी भूसंपादन प्रक्रिया जमिनीचे मूल्यांकन अडीच पट करावे जमिनीवर मिळणारे अनुदेय अनुदान बागायती दराप्रमाणे मिळावे यासह अनेक प्रश्न शेतकरी वर्गाने बैठकीत उपस्थित केले शासन दरबारी हे प्रश्न मांडले जातील असे आश्वासन आधिकारी वर्गाने दिल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.

दरम्यान नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गामुळे गोदावरी नदी काठच्या पुणतांब्यासह अनेक गावांच्या विकासाला मदत होणार आहे तसेच धोत्रे येथील नियोजितकृषी समृध्दी केंद्रामुळे रोजगाराच्या संधी परिसरात उपलब्ध होणार असल्यामुळे ही कामे लवकर सुरु करावीत अशी बहुतांशी गावातील शेतकरी वर्गाची मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com