शेतीच्या अर्थकारणाला येणार सुगंध...

रस्तापूरमध्ये सुंगधी जिरेनियम वनस्पतीची लागवड
शेतीच्या अर्थकारणाला येणार सुगंध...

नेवासा/सुखदेव फुलारी | Newasa/Sukdev Fulari

नेवासा (Newasa) तालुक्यातील रस्तापूर (Rastapur) येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी अशोकराव गायकवाड (Ashokrao Gaikwad) यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत एक एकर क्षेत्रात सुंगधी जिरेनियम वनस्पतीची (Geranium plant) लागवड केली आहे.

शेतीच्या अर्थकारणाला येणार सुगंध...
सार्वमत संवाद | करोनानंतरची शाळा : परिस्थिती कठीण, पण शिक्षक सज्ज

राज्यातील शेतकरी (farmer) पारंपारिक शेतीपेक्षा (Traditional farming) वेगळा मार्ग स्वीकारातना दिसत आहेत. नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील अशोकराव गायकवाड या शेतकऱ्यानं आपल्या शेतात सुगंधी वनस्पती जिरेनियमची लागवड करण्याचा प्रयोग केला आहे. सुंगधी वनस्पती म्हणजेच जिरेनियम (Geranium Farming) शेतीचा नेवासा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. जिरेनियम वनस्पतीच्या पानांपासून तेल काढून ते विविध कंपन्यांना विकले जाते तसेच रोपे तयार करून लागवडीसाठी विक्री करण्यात येते. गायकवाड यांनी 4 फूट बाय 1.5 फूट अंतरावर रोपांची लागवड केली असून एकरी 12 हजार रोपे लागली आहेत.एक रोप 5 रुपयांना मिळते. जिरेनियमच्या झुडपाची लागवडीपासून 3 ते 4 महिन्यात साधारणतः तीन ते चार फूट उंची पर्यंत वाढ होऊन पाल्याची पहिली कापणी होते.त्यांनतर पुढील प्रत्येक 3 महिन्यांनी कापणी केली जाते.एका एकरात एका कापणी पासून 5 टना पर्यंत पाला व त्या पाल्यापासून 5 किलो सुगंधी तेल मिळू शकते.लागवड केल्यापासून 3 वर्षांपर्यंत उत्पन्न घेता येते.

उत्पन्न कसं मिळतं...

जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून 30 ते 35 किलो सुगंधी तेल (Essential oil) मिळतं. जिरेनियमच्या तेलाला एका किलोला 12 ते 14 हजार रुपये भाव मिळतो. गायकवाड यांनी मुंबई (Mumbai) येथील केळकर कंपनीशी (Kelkar Company) करार केला आहे. त्यामुळे विक्रीचा हमखास मार्ग उपलब्ध झालेला आहे.

शेतीच्या अर्थकारणाला येणार सुगंध...
Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्णांची नोंद

जिरेनियम शेतीतून एकरी 10 ते 15 किलो सुगंधी तेलाच उत्पादन..

प्रक्रिया करुन जिरेनियम या वनस्पतीच्या पानांपासून तेल काढलं जाते. जिरेनियमच्या तेलाला प्रतिकिलो 12500 रुपयापर्यंत भाव मिळतो. एकरी 10 ते 15 किलो तेलाचं उत्पादन करता येते. साधारणता शेतकऱ्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल असं गायकवाड यांनी सांगितले.

तेलाचं काय होत?

जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते. एका एकरमध्ये 10 हजार रोप लागतात. हे पिक एका वर्षात तीन ते चार वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत पाणी कमी लागते, रोगारांचा प्रादुर्भाव अत्यन्त कमी, फवारणी व खते यांचा खर्च कमी आहे. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते. कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते. एका एकरात 30 ते 40 किलो ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत जाग्यावर 12 हजार 500 रुपये मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळते. एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख रुपये मिळते. या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिक साठी याचा वापर केला जातो. फरफ्युममध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते. त्यामुळे जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण (Scented soap), अगरबत्ती ((Agarbatti), अत्तर (perfume) तयार करण्यासाठी केला जातो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com