पारनेर : खरीप हंगामासाठी ६१ हजार हेक्टरवर पेरणी

पारनेर : खरीप हंगामासाठी ६१ हजार हेक्टरवर पेरणी

पारनेर | तालुका प्रतिनिधी

तालुक्यात यंदा खरिपाची सुमारे ६१ हजार १७५ हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत सुमारे ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सध्या पीकस्थितीही चांगली आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे पाऊससुद्धा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. सध्या रोज रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, तालुक्यात मोठ्या व जोरदार पावसाची गरज आहे.

तालुक्यातील ३१ गावे खरिपाची आहेत. या भागातील शेतक-यांची खरीप पिकावरच अधिक मदार असते. दर वर्षी सुमारे ८३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. यंदा तालुक्यातील चार मंडलांत सुमारे ६१ हजार १७५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

टाकळी ढोकेश्वर मंडलात सुमारे ७७९ हेक्टरवर कांदा लागवड, तर त्या खालोखाल ५६५ हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली. कृषीची तालुक्यात पारनेर, टाकळी ढोकेश्वर, सुपे व निघोज अशी चार मंडले आहेत.

यंदा या चारही मंडलांत सुमारे तीन हजार २२० हेक्टरवर भाजीपाला लागवड असून, पाच हजार ५४६ हेक्टरवर कडधान्ये व सहा हजार २४१ हेक्टरवर चारापिके घेतली आहेत. निघोज मंडळातच फक्त उसाची लागवड होते. इतरत्र ती नाममात्र असते.

यंदा जून महिन्यात दर वर्षीप्रमाणे सरासरीइतका पाऊस झाला. यंदा सुमारे शंभर मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच सध्या तालुक्यात सर्वत्र रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू आहे. मात्र आता तालुक्यासाठी रिमझिम पावसाऐवजी जोरदार व पाणी साठविणारा पाऊस होणे गरजेचे आहे.

दर वर्षीप्रमाणे सरासरीइतका पाऊस आतापर्यंत तालुक्यात झाला आहे. फक्त मोठ्या पावसाची गरज आहे. यंदा तालुक्यात बियाण्यांचा तुटवडा जाणवला नाही, तसेच खतांचाही तुटवडा नाही. विक्रेत्यांनी औषधे व खते यांची वाजवी दरानेच विक्री करावी. विक्रेत्यांनी वाढीव किंमत घेतल्यास त्याबाबत तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.

विलास गायकवाड (तालुका कृषी अधिकारी, पारनेर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com