अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी!

अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी!

वैजापुर | प्रतिनिधी | दिपक बरकसे

छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापुर तालुक्यातील असुन कांद्यानी आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे . कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असल्याने आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

गेल्या बर्‍याच दिवसांपासून कांद्याला बाजारभाव मिळत नाही, भावात काही सुधारणा होत नसल्याने कांदा कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. साठवणुकीसाठी कांदा चाळी मोठ्या प्रमाणात झाल्या काहिना अनुदान मिळाले तर कहीनी कर्ज काडुन कांदा चाळी केल्या, नानाप्रकारच्या झळा सोसत कांदा पीक काढले; मात्र बळीराजाला आजच्या भावात खर्चदेखील निघत नसल्यामुळे कांदा मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा जनावरांना टाकण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे.

अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी!
H3N2 व्हायरसनं टेन्शन वाढवलं! हरियाणा, कर्नाटकनंतर 'या' राज्यात घेतला बळी

अलीकडे बळीराजाचे दुखः सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करतांना केविलवाणा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. वर्षभर सर्वच पिकांमधून तोटा सहन करावा लागल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करणार्‍या बळीराजाच्या मनाला थोडासा आधार देण्यासाठी शेतकर्‍यांचीच मुले सरसावल्याचे सोशल मीडियावर फिरणार्‍या संदेशांवरून दिसत आहे. कांदा खाणारे ग्राहक व राजकीय नेत्यांच्या शेतकर्‍यांबद्दलच्या अनास्थेबाबत भावनिक व विनोदी मजकुराची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. शेतकर्‍यांच्या भावना व मेहनतीची कदर करणारे संदेश 'शेअर' करण्याची चढाओढ सध्या दिसून येत आहे.

अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी!
धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल

शेतकऱ्यांना पैशासाठी बॅकावर अवलंबून राहावे लागते. शेती करण्यासाठी मजुरांवर तर शेतमाल विकण्यासाठी दलाल व व्यापारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. येवढे करून बेभाव कांदे विकण्यापेक्षा जानावरांना घातले तर काय वाईट आहे?

राघुबा किटे (मेंढपाळ, शेतकरी तलवाडा)

शेतकऱ्यांना पैशासाठी बॅका वर अवलंबून राहावे लागते, तर शेतमाल विकण्यासाठी दलाल व व्यापारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. यामुळे अचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथेकडे सरकार शेतकर्‍यांच्या डोळ्यातून वाहणारे पाणी का दिसत नाही. या कुषी प्रधान देशात शेतकर्यावर आत्महत्येची वेळ यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती आहे.

नितीन आहेर (शेतकरी, पाराळा)

अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी!
श्रीगोंद्यातील अरणगाव दुमाला येथे सशस्त्र दरोडा, हल्ल्यात एकाचा मृत्यू

कांद्याचे उत्पादन व मागणी याचा विचार करून कांदा निर्यात धोरण ठरवुन शेतकऱ्यांना किमान आधारभुत किमत ठरवुन योग्य भाव देणे गरजेचे आहे. माञ कुठलेही नियोजन केले जात नाही.सरकार कुठलेही असो शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण झालेले आहे .

दादासाहेब तांबे (ता.अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com