पुणतांबा आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी मंत्रालयात 7 जूनला बैठक

दोन दिवसाकरिता आंदोलन स्थगित || कोअर कमिटीचा निर्णय बैठकीचे निमंत्रण स्वीकारले
पुणतांबा आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी मंत्रालयात 7 जूनला बैठक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याबरोबर भ्रमणध्वनीद्वारे पुणतांबा (Puntamba) येथील आंदोलक किसान क्रांतीच्या (Kisan Kranti) शेतकर्‍यांनी 14 मागण्या केलेल्या असून संबंधित विभाग, मंत्री व सचिव याचेसमवेत मुंबई मंत्रालयात 7 जूनला आयोजन करून सकारात्मक चर्चेतून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची भूमिका राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी किसान क्रांतीच्या आंदोलक शेतकर्‍यांशी (Movement Farmer) भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. दोन दिवस आंदोलक स्थगित करण्यात येणार मंत्रालयातील चर्चेनंतर पुणतांबा ग्रामसभेत माहिती देऊन पुढील निर्णय होईल, असे आंदोलक शेतकर्‍यांच्या कोअर कमिटीने ना. दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या समवेत जाहीर केले.

पुणतांबा किसान क्रांती शेतकर्‍यांचा (Puntamba Kisan Kranti) आंदोलनाचा चौथा दिवस असून सकाळी 10:30 वाजता राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी आंदोलक शेतकर्‍यांबरोबर ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे 3 तास मॅरेथॉन चर्चा करून मंगळवार दि. 7 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यासमवेत सर्व विभागाचे मंत्री व सचिव बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे निश्चित करण्यात आले.

यावेळी कृषीमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्या काय आहे, त्या समजून घेण्यासाठी येथे आलो आहे. अडीच ते तीन तास झालेल्या बैठकीत 15 वेगवेगळ्या मागण्या असून काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय केला. काही इतर विभागाशी संबंधित आहे. त्यांच्याशी एकत्र बसून निर्णय घेण्यात येईल. शिवाय महात्मा फुले कर्जमाफी शेतकर्‍यांना हेलपाटे न मारता दिली. नियमीत कर्जफेड करणारांचा डाटा गोळा करण्याचे काम सुरु असून लवकरच पात्र यादी जाहीर करण्यात येइल. डॉ. पजांबराव देशमुख व्याज माफी योजनेचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. यासाठी एक लाख कर्ज मर्यादा तीन लाखांची करण्यात आली. यावर शून्य टक्के व्याज दर आहे. पूर्वी ठिबक करिता 45-50 टक्के अनुदान आता 80-85 टक्के संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्चेअंती शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करून सर्व विभाग, मंत्री व सचिव यांची किसान क्रांतीच्या आदोलकांसमवेत चर्चा मंत्रालयात होईल. 15 मुद्यावर चर्चा करणार ही ना. भुसे यांची विनंती आंदोलक शेतकर्‍यांच्या कोअर कमिटीने मान्य केली. या चर्चेतून जे निष्पन्न होईल ती चर्चा पुणतांबा ग्रामसभेत ठेवली जाईल. मग पुढील आंदोलनाचा निर्णय होईल. राज्याच्या शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील, असे किसान क्रांती आंदोलन कोअर कमिटी सदस्य सरपंच डॉ. धनंजय धनवटे, विकास आघाडीचे धनंजय जाधव, शिवसेनेचे सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण यांनी माहिती दिली.

यावेळी खा. सदाशिव लोखडे, शिवसेन जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, माजी सरपंच मुरलीधर थोरात, स्वामी विवेकानंद पतसंस्थचे चेअरमन सुभाष वहाडणे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, शिवसेनेचे अनिल नळे, गणेश बनकर, दत्तात्रय धनवटे, राजेंद्र झावरे, आबासाहेब नळे, निकीता जाधव, सचिन कोते, सुधाकर जाधव, अ‍ॅड. सुधीर नाईक, शिवाजी ठाकरे, नितीन औताडे, देवीदास सोनवणे, शिवसेनेचे भास्कर मोटकर, महेश कुलकर्णी, दिगंबर तांबे आदींसह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com