श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्र सरकारने केलेले कृषी व कामगार कायदे मागे घेण्यात यावे, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार

युनियनच्या वतीने काल काल छत्रपती संभाजीराजे चौक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तहसीलदार प्रशांत पाटील यांना भाजपा सरकारचे निषेध करणारे निवेदन देण्यात आले.

कामगार नेते नागेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कामगार, आयडीया टॉवर कामगार, ट्रान्सपोर्ट हमाल-माथडी कामगार, महाबीज कामगार, सिमेंट युनियन कामगार, पेठ हमाल माथडी कामगार, शेतमजूर, हातगाडी कामगार, रिक्षा युनियन आदी कामगारांसह मराठा स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

केंद्र सरकारने कामगार व शेतकर्यांविरुद्ध काळे कृषी कायदे केले हे कायदे भांडवलदार धार्जीणे असून यामुळे कामगार, कष्टकरी, शेतकरी उध्दवस्त होणार आहे. या कायद्यात किमान आधारभूत भावाची कुठलीही तरतूद नाही. शेतकर्याचे विकासाचे केंद्र असलेल्या मार्केट कमिटी या बरोबरच तेथे काम करणार्या हजारो कामगारांचे संसार मोडीत निघणार असून शेतकरी व कामगारांचे संरक्षण हिरावून घेण्याचा प्रकार आहे.

वेगवेगळे काळे कायदे निर्माण करून भाजपाच्या मोदी सरकार ने वंचितांंना न्याय देण्याऐवजी बहुमताच्या जोरावर अनेक घातक निर्णय घेतले आहे. हे निर्णय म्हणजे प्रगतीला आडकाठीच असा आरोप याप्रसंगी कामगार नेते नागेश सावंत यांनी केला.

यावेळी यूनियनचे राज्य प्रतिनिधी राजेंद्र भोसले, जलील शहा, भरत जाधव, विष्णू भागवत, जनार्दन भवर, भारती शिंदे, सिंधूबाई बनकर, ज्योती राठोड, लता माळी, कुसूमबाई पवार, सचिन बीरसने, मनोज पवार, राहुल पंतगे, शेयाब शाह, भारत खंडागळे, बाबु शाह कादर शाह, नंदु रोकडे, शफिक शेख, अरुण बडवे, मधुकर खंडागळे, तुकाराम खंडागळे, सुरज जाधव, राजेंद्र यादव, राहुल गायकवाड, बी. एम. पवार, इकबाल शाह, अन्सार शाह, बाबासाहेब त्रिभुवन, डी. एस. जाधव, बाबुराव सोनवणे, ताराचंद आलगुंडे, दत्तु म्हसे, सुखदेव गावडे, नंदा मोरे, भिमबाई बर्डे, लक्ष्मी माळी यांच्या हस्ते तहसीलदारांना युनियनच्या वतीने देण्यात आले.

छत्रपती राजे संभाजी चौकात अचानकपणे नरेंद्र मोदी यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोदी यांच्या एका हातात गाजर तर दुसर्या हातात मुळा होता. शेतकर्यांना गाजर दाखविले तर कामगारांना मुळा. गाजर व मुळा हा चर्चेचा विषय ठरला. याप्रसंगी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.