कृषी दिन विशेष : खासगी कृषी कंपन्या देणार शेतकर्‍यांना पिक व्यवस्थापनाचा तंत्र

कृषी दिन विशेष : खासगी कृषी कंपन्या देणार शेतकर्‍यांना पिक व्यवस्थापनाचा तंत्र

जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघाचे बड्या कृषी कंपन्यांसोबत करार अंतिम टप्प्यात || राज्यातील पहिला प्रयोग नगर जिल्ह्यात

अहमदनगर |ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

शेतकरी शेतात घेणार्‍या पिकांसाठी खते, किटक नाशकांचे नियोजन कसे करावे, कोणत्या पिकाला कोणते खत, कोणत्या किटक नाशकांचा किती वापर करावा, खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर झाल्याने पिकासोबत जमिनीचा पोत कसा खराब होते, हे तांत्रिकदृष्ट्या सिध्द करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघाने थेट कृषी निविष्ठा क्षेत्र असणार्‍या सिझेंनटा, बायर या सारख्या बड्या कंपन्या सोबत करार करून कृषी तंत्र स्वीकरणार्‍याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधीत कंपन्यासोबत शेतकरी उत्पादक कंपनी संघाचा करार अंतिम टप्प्यात आहे. अशा प्रकारे प्रयोग करणार नगर जिल्ह्यात राज्यात पहिला आहे.

जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षात 449 शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती होवून त्यांची स्थापना झालेली आहे. या सर्व कंपन्यांची जिल्हा कृषी विभागाकडे नोंदणी झालेली असून यातील 40 ते 50 कंपन्यांनी जोमाने कामाला सुरूवात केलेली आहे. राज्य सरकारकडून या कंपन्यांना पुढे येण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सवलती देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील 40 ते 50 कंपन्यांनी एकत्र येवून जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघाची निर्मिती केली असून हा संघ आता या शेतकरी कंपन्यासाठी एकत्रित काम करत आहे. या संघाच्या माध्यमातून शेतकर्‍या पिकांची संस्थात्मक खरेदीला प्रोत्साहन देण्यात येत असून यामुळे त्याचा थेट रिलायन्स, वॉलमाट साखर बड्या समुहा सोबत करार होवून शेतकर्‍यांची मालाची थेट विक्री सुरू झाली आहे.

यासह शेतकर्‍यांच्या या कंपन्यांनी नाफेडच्या साह्याने कांदा खरेदी, हरभरा खरेदी आणि बफर स्टॉक करण्यास सुरूवात आहे. यामुळे बाजारपेठीतील मध्यस्तांची साखळी कमी होवू शेतकर्‍यांचा माल थेट बड्या बाजारात पोहत असून याचा शेतकर्‍यांना थेट आर्थिक फायदा होत आहे. यापुढे जावून आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकर्‍यांना शेती तंत्रज्ञ आणि खते, किटक नाशकांचा योग्य वापर कसा करावा आणि यातून किफायतशीर शेती कशी करावी, यासाठी थेट कृषी निविष्ठ क्षेत्रात बडे नाव असणार्‍या सिझेंटा आणि बायर या व्यवसायिक खासगी कंपन्यासोबत करार करून त्यांच्या कृषी तंत्रक यांच्या मार्फत शेतकर्‍यांना मोफत पिकांचे व्यवस्थापनाचा मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या खासगी कंपन्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसोबत करार करून त्यांना खते, बियाणे आणि किटकनाशक वापराचे आधूनिक तंत्रज्ञान देण्याचे तत्वता मान्य केले असल्याची माहिती वांबोरी फार्मर प्राड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रा. जी. एम. चिंधे यांनी दिली.

जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा संघ स्थापन झालेला आहे. या संघाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम सुरू करण्यात आलेले आहे. एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये 300 ते 400 सभासद शेतकरी असून जिल्ह्यात सध्या 40 ते 50 कंपन्या प्रभावीपणे कार्यरत असून त्यांचा वार्षिक उलाढाल ही 30 ते 40 रुपये आहे. भविष्यात ही उलाढाल 100 कोटीपर्यंत नेण्याचा मानस आहे.

- प्रा. जी. एम. चिंधे, अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी संघ.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com