कृषी दिन विशेष : शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांची समृध्दीकडे वाटचाल

कृषी दिन विशेष : शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांची समृध्दीकडे वाटचाल

कृषी विभागाचा संरक्षीत, सुक्ष्म शेतीवर भर : विविध योजनामधून शेतकर्‍यांना दिला लाभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात (state) ज्यावेळी शेतकर्‍यांची पिक उत्पादित कंपन्यांची (Farmers' crop production companies) संकल्पना पुढे आली. त्यावेळी राज्यासह काही मोजक्या जिल्ह्यातही (Ahmednagar District) शेतकरी उत्पादक कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यावेळी बोटावर असणार्‍या कंपन्यांची जिल्ह्यातील संख्या आज 449 झाली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल विक्री, साठवणूक यातील मध्यस्त असणारी व्यवस्थेला छेद देवून थेट बाजारपेठेवर नियंत्रण (Market control) मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कृषी विभागाने अलिकडच्या काही वर्षात शेतकर्‍यांना शेतीतळी, कांदा चाळ, शेड-नेट, सुक्ष्म सिंचन, सामुहिक शेततळीच्या माध्यमातून संरक्षीत शेती करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

जिल्हा आकारमानाने विस्तृत आहे. यासह जिल्ह्यातील (District) भौगोलिकदृष्ट्या विविधता असून काही ठिकाणी मुबलक पाऊस आणि पाणी तर काही पिण्याच्या पाण्यासाठी वनवन अशी स्थिती आहे. अशा जिल्ह्यात ऊस, फळबागा, कांदा, चारा पिके ही मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारचा कृषी विभागाकडून (State Government Agriculture Department) शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या 10 हजार 769 कांदा चाळीची निर्मिती झालेली असून त्यात 2 लाख 77 हजार मेट्रीक टन शेतकरी स्वत:चा कांदा साठवून ठेवू शकतात.

जिल्ह्यात सध्या 1 लाख 19 हजार मेट्रीक टन कांदा शेतकर्‍यांनी साठवून (Onion storage by farmers) ठेवलेला आहे. यासह जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेत 17 हजार शेततळी निर्मिती करण्यात आलेली असून यातील 5 हजार 405 शेततळ्यांचे अस्तिरिकरण झालेले आहे. नियंत्रित शेतीमध्ये जिल्ह्यात 1 हजार 259 हरितगृह आणि शेडनेट असून त्याचे क्षेत्र 236 हेक्टर आहे. यात 555 शेड-नेट असून त्याचे क्षेत्र 101 आहे. तर 694 हरितगृह आहेत. त्याचे क्षेत्र 135 हेक्टर आहे. जिल्ह्यात 96 हजार ठिबक सिंचनाचे संच (Set of Drip Irrigation) असून त्यातून 69 हजार 728 हेक्टर क्षेत्राला पाण्याच्या सुक्ष्म सिंचना लाभ देता येतो.

फळबागांसाठी (Orchards) 2 हजार 816 सामुहिक शेततळे असून त्यातून 11 हजार 547 क्षेत्र ओलीता खाली आलेले आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांनी त्यांच्या उत्पादिक मालाला योग्य बाजार पेठ मिळावी, यासाठी स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. साधारणपणे एका कंपनी 400 च्या जवळपास शेतकरी त्याचे सभासद असून अशा जिल्ह्यात (District) 449 कंपन्या सध्या कार्यरत आहे. विविध कडधान्य, कांदा, फळांची विक्री या कंपन्यामार्फत थेट बाजारपेठेत अथवा ग्राहकांपर्यंत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी कंपन्यांनी स्वत:च्या बियाणे, किटक नाशके (Insecticides) आणि खते विक्रीचे आऊलेट अथवा दुकाने सुरू केलेली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची वाटचाल समुद्धीकडे सुरू असल्याचे चित्र आहे.

अशा आहेत शेतकर्‍यांच्या कंपन्या

नगर 30, पारेनर 21, पाथर्डी 19, कर्जत 55, जामखेड 15, श्रीगोंंदा 35, श्रीरामपूर 26, शेवगाव 25, नेवासा 36, राहुरी 40, संगमनेर 57, अकोला 26, राहाता 31 आणि कोपरगाव 33 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com