पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

महाराष्ट्र राज्य शेती महमंडळाच्या लक्ष्मीवाडी मळा अंतर्गत रस्तापूर शिवारातील अंदाजे 250 एकर शेती क्षेत्रावर झालेले अतिक्रमण

शेती महामंडळाच्या सहाय्यक व्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक श्रीमती वर्षा लढ्ढा यांच्या मार्गदर्शना खाली व हायकोर्टाच्या निर्देशानुसार शेती महामंडळ, महसूल व पोलिस यत्रणा यांनी संयुक्तपणे कारवाई करून अतिक्रमण काढण्यात आले, असे राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितले.

शेती महामंडळाच्या लक्ष्मीवाडी मळा अंतगर्त रस्तापूरच्या शिवारात असलेल्या अंदाजे 250 एकर शेती क्षेत्रावर गेली 10 ते 12 वर्षापासून काही कुंटुंब कोप्या करुण राहाने काही क्षेत्रावर शेती उत्पन्न घेणे अशा स्वरूपाचे अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश घेऊन शेती महामंडळच्या सहाय्यक व्यावस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक श्रीमती वर्षा लढ्ढा, शिर्डीचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, शिर्डीचे डिवायएसपी सातव, राहाता तहसिलदार कुंदन हिरे, सर्कल श्रीमती सोनवणे, तलाठी दिलीप कुसळकर, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत व 250 पोलिसांसह मोठ्या फौजफाठ्याने मंगळवार सकाळी 7 वाजता अतिक्रमण स्थळी दाखल होऊन प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात करण्यात आली.

गेल्या एक वर्षापासून अतिक्रमन करणार्या कुटुंबाना समोपचाराने समजून सांगत तसेच प्रांताधिकारी व शेती महामंडळाचे अधिकारी, अतिक्रमण धारक कुंटुंब यांना वेळोवेळी बैठका घेऊन समज देण्यात आली होती. मंगळवारच्या कारवाईत अनेक कुंटुंबानी कोप्यातील बिर्हाड घेऊन अगोदरच निघुन गेले होते. त्यामुळे अतिक्रमण धारकांचा कोणताही विरोध झाला नाही. सर्व कारवाई शांततेत पार पडली, असे तहसिलदार कुंदन हिरे यांनी भ्रमणध्वनीवरून दै. सार्वमतशी बोलताना स्पष्ट केले.