शेतकर्‍यांच्या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतीशाळेची मोठी मदत

मल्हारवाडीचे शेतकर्‍यांची प्रतिक्रिया || शेती शाळेला मोठा प्रतिसाद
शेतकर्‍यांच्या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतीशाळेची मोठी मदत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शेती शाळेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून गावातील शेतकर्‍यांच्या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतीशाळेची मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया मल्हारवाडी येथील शेतकर्‍यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील काकडी मल्हारवाडी येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मका, सोयाबीन पिकावर शेतीशाळाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. यासाठी शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत असून, गावातील शेतकर्‍यांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीशाळेची मोठी मदत होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

यावेळी कृषी सहाय्यक सुनील घारकर यांनी सोयाबीन पिकांंच्या बियाणे उगवण क्षमता, बीजप्रक्रिया, पेरणी पद्धती, योग्य जातीच्या बियाणांची निवड, पेरणी अंतर, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच कीड व रोग याबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी महात्मा गांधीं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांधावर आंबा, नारळ, सीताफळ यासारखी फळपिके लागवडीबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक विशाल साबदे यांनी मका पिकांंच्या लागवडी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.स्थानिक शेतकरी बाबासाहेब गुंजाळ यांनी आपले शेतीशाळेबाबतचे अनुभव सांगितले.

याप्रसंगी दत्तू गुंजाळ, मच्छिंद्र शिंदे, नंदू एलमामे, संजय वेताळ, बाबासाहेब रोडे, बाबासाहेब गुंजाळ, मनोहर गुंजाळ,सुुरेश गुंजाळ,सुनील लहामगे, रावसाहेब कोल्हे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com