कृषी पर्यवेक्षक अखेर निलंबित

महिलेसोबतचे अश्लील चाळे नडले
कृषी पर्यवेक्षक अखेर निलंबित

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

महिलेसोबत अश्लील चाळे करून व्हिडिओ व्हायरल करणारा कृषी पर्यवेक्षक सुरेश घोलप याला अखेर तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक यांनी काल सायंकाळी ही कारवाई केली आहे.

कृषी पर्यवेक्षक सुरेश कांतीलाल घोलप हा तालुक्यातील कोकणगाव येथे नियुक्तीस होता. सेवेत असताना वेगवेगळ्या कारणामुळे तो वादग्रस्त ठरला होता. एका महिलेसोबत सुरू असलेले अश्लील चाळे घोलप याने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले होते. पतीचे इतर महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध समजल्याने संतप्त झालेल्या त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दोन दिवसापूर्वी स्वतःचेच अश्लील फोटो त्याने सोशल मिडीयावर टाकले होते. याबाबतचे वृत्त काल प्रसिद्ध होताच कृषी विभागाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली. तालुका कृषी अधिकारी यांनी अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर यांना माहिती कळवली. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षकांनी पुणेेे येथील अधिकार्‍यांना ही माहिती कळवली.

विभागीय कृषी सहसंचालकाने सहसंचालकांनी घोलप याच्याविरुद्ध त्वरित शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाचे आदेश काढले.

निलंबनाचा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत कृषी पर्यवेक्षक सुरेश घोलप हा राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात राहील . उपविभागीय कृषि अधिकारी, राजगुरूनगर यांचे पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय घोलप याला सोडता येणार नाही.

निलंबनाचे आदेश अमलात आहेत तो पर्यंत घोलप यालाज्खा जगी नोकरी स्विकारता येणार नाही. अथवा स्वतःला व्यापार अथवा उद्योगधंद्यात गुंतवणुक करता येणार नाही, अन्यथा ते गैरवर्तन केल्याचे समजण्यात येवून निर्वाह भत्ता मिळण्यास ते अपात्र ठरतील असे निलंबनाच्या पत्रात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com