कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची लूट

जादा दराने युरियाची विक्री
कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची लूट

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शहरातील तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये (Agricultural Service Center) युरिया खरेदीसाठी (Buy urea) आलेल्या शेतकर्‍यांची सर्रासपणे लूट होत (Farmers were being plundered extensively) असल्याचा प्रकार समोर आला आहे. 266 रुपये किंमतीची युरियाची (Urea) एक गोणी शेतकर्‍यांना थेट 350 रुपयांना विकली जात आहे. तर अनेक कृषी सेवा केंद्रांकडून (Agricultural Service Center) बिलही दिली जात नाहीत.

दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांची मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. युरिया खत (Urea fertilizer) घेण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची झुंबड उडत आहे. युरियाचा तुटवडा (Urea shortage) असल्याने शेतकर्‍यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. याचाच फायदा काही संधीसाधू घेत आहेत. राहाता (Rahata) तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर (Agricultural Service Center) चढ्या दराने युरिया विकली जात आहे.

266 रुपयांची एक गोणी 350 रुपयांना विकली जात असून 80 ते 85 रुपये जास्त आकारले जात आहेत. तुटवडा असल्याने नाईलाजास्तव शेतकर्‍यांना वाढीव पैसे देऊन युरिया खरेदी करण्याची वेळ आली आहे. तर काही कृषी सेवा केंद्रांमध्ये (Agricultural Service Center) युरिया गोणी हवी असेल तर शेतीसाठी लागणारे इतर खते किंवा औषध घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांना काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून (Agricultural Service Center Operators) तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे.

गाव पातळीवर वाद नको म्हणून शेतकरी याबद्दल तक्रार करण्यास किंवा आवाज उठवण्यास तयार नाहीत. त्याचाच फायदा काही कृषी सेवा केंद्र चालक घेत आहेत. त्यामुळे याप्रकरणी कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

प्रत्येक गोणीवर किंमत छापलेली असते. मात्र शेतकर्‍यांकडून जास्त पैसे घेऊन जर युरिया विकली जात असेल तर या प्रकरणाची शहानिशा करून अशा कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात येईल.

- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी, राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com