'या' कंपनीने कृषी सेवा केंद्रचालकांना कोट्यावधी रूपयांना घातला गंडा

'या' कंपनीने कृषी सेवा केंद्रचालकांना कोट्यावधी रूपयांना घातला गंडा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

अमेरिकेची किटकनाशक कंपनी (American pesticide company) असल्याचे भासवून एका कंपनी मालकाने नगर जिल्ह्यासह राहाता (Rahata), राहुरी (Rahuri) व श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील सुमारे 25 हून अधिक कृषी सेवा केंद्रचालकांना (Agricultural Service Center) कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. बोगस किटकनाशक (Pesticides) देऊन कृषी सेवा केंद्रचालकांना (Agricultural Service Center) कृषी खात्यातील अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने त्याची विक्री (Sales) करण्यात आली आहे. मात्र, हे किटकनाशक (Pesticides) बोगस असल्याने त्यात शेतकर्‍यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक (Fraud) झाली आहे. या कंपनीविरोधात थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (Home Minister Dilip Walse) यांच्याकडे समक्ष भेटीत तक्रार करण्यात आली असून काही शेतकरी व कृषी सेवा केंद्रचालक (Agricultural Service Center) गृहमंत्री वळसे (Home Minister Dilip Walse) व कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांची समक्ष भेट घेणार असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली आहे.

दरम्यान, या कंपनीविरोधात बोगस किटकनाशकाचे (Pesticides) पितळ उघडे पाडणार्‍या चार तरूणांवर संबंधित मालकाने राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह कृषी सेवा केंद्रचालक संतप्त झाले आहेत.

बाजारपेठेत बोगस किटकनाशकांची विक्री (Pesticides Sales) करणार्‍या या कंपनीने सुमारे 40 हून अधिक कृषी पदवीधर (Agricultural graduate) असलेल्या तरूण कामगारांचे लाखो रुपयांचे वेतन थकविले असून जो वेतन मागतो, त्याला पोलिसी कारवाईची धमकी (Threats of police Action) देण्यात आली असल्याचे पदवीधर तरूणांनी सांगितले.

नगर जिल्ह्यातील 5 हजार शेतकरी, 35 कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Center), 10 कृषी पदवीधरांची फसवणूक (fraud) करून संबंधित कंपनी मालकाने सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक (fraud) केली आहे. अमेरिकेची कंपनी (American company) असल्याचे भासवून खोटे दस्ताऐवज तयार करून कोकणापासून विदर्भापर्यंत कृषीनिविष्ठा क्षेत्रात 25 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. तर वेतनाची मागणी करणार्‍या कृषी पदवीधर कर्मचार्‍यांवर राहाता (Rahata) व शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहाता (Rahata) येथे पोलिसांनी (Police) संबंधित तरूणांचे मोबाईल जप्त (Mobile Seized) करून कंपनीविरोधात असलेले पुरावे नष्ट केल्याचा आरोप या तरूणांनी केला आहे.

याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांसह कृषीमंत्र्यांकडे (Agriculture Minister) करण्यात आली आहे. त्यांनी राहाता पोलीस ठाण्याच्या (Rahata Police Station) अधिकार्‍यांना याबाबत आदेश देऊनही पोलिसांनी त्या तरूणांवर दबंगगिरी केली आहे. विशेष म्हणजे दि. 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताकदिनी या पदवीधर तरूणांनी कंपनीविरोधात एल्गार करून न्याय मागितला होता. तर दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी या तरूणांवर गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कंपनीविरोधात व राहाता पोलीस ठाण्याच्या (Rahata Police Station) अधिकार्‍यांवर कारवाई अन्यथा मंत्रालयासमोर (Ministry) आमरण उपोषण करण्याचा इशारा (Hint) तरूणांनी दिला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक (fraud) झालेल्या कृषी सेवा केंद्रचालकांनीही संबधितावर कारवाईची मागणी (Demand) केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com