कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे 2 जूनपासून आंबा महोत्सव
लोणी |प्रतिनिधी| Loni
कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे गुरुवार दि.2 जून 2022 पासून पाचदिवसीय आंबा महोत्सव आणि कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी दिली.
कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, आय.सी.ए.आर.अटारी, पुणे, आत्मा अहमदनगर, कृषि विभाग, नाबार्ड पुणे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने होणा-या शुभारंभ माजी मंञी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या आंबा महोत्सव कृषि प्रदर्शन, आंबा फळ प्रदर्शन, आंबा पीक परिसंवाद, शेतकरी ते थेट ग्राहक आंबा विक्री या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवार दि. 2 जुन 2022 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, नाबार्डचे जिल्हा समन्वयक शिलकुमार जगताप, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप आदीच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
याविषयी माहीती देतातांना डॉ.नालकर म्हणाले आंबा महोत्सवामध्ये शेतकर्यांना आंबा विक्री बरोबरच आंबा पिकाचे लागवड तंत्र आणि कृषिविषयक माहीती देणारे कृषि प्रदर्शन देखिल होणार आहे. आंबा विविध जाती, आंबा पिक कला प्रदर्शन, आंबा महोत्सवानिमित्त एकरी आठ टन आंबा उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन, कापूस, मका उत्पादन तंत्रज्ञान, समुहाचे अति सघन आंबा लागवड, आंबा प्रक्रिया आणि निर्यात, आंबा पिकांमध्ये संजिवकांचा वापर, आंबा रोप कलमीकरण आणि पुनर्जीवन, आंबा मुल्य संवर्धन, डिजीटल आणि सोशल मिडीयाद्वारे आंबा विक्री, इस्त्राईल पध्दतीने आंबा लागवड, आंब्याची शेतावरील पिकवण आणि ऑन लाईन विक्री आदी विषयी तज्ञाचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे. या कृषि आंबा महोत्सव आणि कृषि प्रदर्शनामध्ये शेतकर्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. नालकर यांनी केले आहे.