कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन
कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खते, बियाणे आणि किटकनाशके यांच्या विक्रीचे परवाने प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी महाआयटीच्या आपले सरकार पोर्टलवर 31 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले आहे.

जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके विक्रीचे डिजीटल स्वाक्षरी असलेले परवाने प्राप्त करण्यासाठी यापुढे नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित झालेली आहे. सदरचे परवाने जुन्या प्रणालीमधून देण्याचे बंद करण्यात आलेले आहे. परवान्याचे नूतनीकरण आणि सुधारणा या बाबीही नवीन परवाना प्रणालीमधूनच करावयाची आहेत. तरी सद्यस्थितीमध्ये ज्या विक्रेत्यांचे वैध असलेले परवाने आणि वैधता संपलेले परवाने अशा सर्व विक्रेत्यांनी आपले परवान्यांची आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी.

या प्रक्रियेत विक्रेत्यांना घरबसल्या नोंदणी करून परवाना प्राप्त करून घेता येणे शक्य होणार आहे. मात्र, यासाठी परवाना धारकांना त्यांचा सद्यस्थितीतील वैध परवाना नवीन प्रणालीवर कार्यान्वित करावा लागणार आहे. ज्या विक्रेत्यांच्या परवान्यांची मुदत 31 जुलै आहे. या नव्याने विकसित झालेल्या ऑनलाईन प्रणालीवर आपला परवाना अद्ययावत करावयाचा आहे. परवाना अद्ययावत करण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क भरण्याची गरज नाही. तसे न केल्यास सद्यस्थितीतील परवाना रद्द समजण्यात येईल आणि त्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,असे आवाहन जगताप यांनी या केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com