शेती पंप चोरणारे 2 चोरटे जेरबंद

कर्जतच्या सोनाळवाडी येथील घटना
शेती पंप चोरणारे 2 चोरटे जेरबंद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील महारूळी येथून चोरी गेलेली शेतीच्या विद्यूत पंपाची मोटार हस्तगत करून जामखेड पोलिसांनी चोरट्यांना भुम येथून अटक केली आहे.

काशिनाथ ढेपे व धनंजय थोरात (रा. महारूळी, ता. जामखेड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील महारूळी येथील शेतकरी अशोक यवले यांच्या विहीरीवरून शनिवारी (दि. 17) सायंकाळी आज्ञात चोरट्याने विद्यू पंपची मोटार चोरी केली असल्याची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार तपास करत असताना जामखेड पोलीसांना काशिनाथ ढेपे व धनंजय थोरात राहणार महारूळी यांनी ही मोटार चोरी केली असून ते गावातुन फरार झाले असल्याचे समजले.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहीती मिळाली त्यानुसार संशयित उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरूड येथे पकडण्यात आले आहेत. यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस कर्मचारी अजय साठे , नवनाथ शेकडे होमगार्ड भिसे यांना पाठवून त्यास ताब्यता घेतले व चोरीस गेलेली मोटर हस्तगत केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com