शेती साहित्याच्या दुकानाला आग

लाखो रुपयांचा माल जळून खाक
शेती साहित्याच्या दुकानाला आग

कोकणगाव |वार्ताहर| Kokangav

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कोकणगाव (Kokangav) येथील शिवानंदन एंटरप्राइजेस या शेती साहित्य विक्रीच्या दुकानाला अचानक आग (Shop Fire) लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले.

शेती साहित्याच्या दुकानाला आग
अमृतसागर दूध संघ निवडणुकीत 'यांचा' झाला दणदणीत विजय

संदीप शिंदे यांच्या मालकीचे कोकणगाव (Kokangav) येथे शेती साहित्य विक्रीचे दुकान आहे. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सदर दुकानाच्या आतून धुर येत असल्याचे काही नागरीकांच्या लक्षात आले. मात्र दुकानाचे (Shop) शटर बंद होते. परंतु दुकानाच्या आत आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. आतमधील प्लॅस्टिक पाईप, ड्रीपचे पाईप, सीनटेक टाकी, पाईपचे सुलोचन, इलेक्ट्रीक सामान असल्याने आगीने जास्तीच पेट घेतला.

शेती साहित्याच्या दुकानाला आग
दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार

कोकणगाव (Kokangav) येथील काही तरुणांनी आग (Fire) विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती कळताच थोरात साखर कारखान्याची अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचला. पाण्याचा प्रचंड मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आग मोठ्या प्रमाणावर असल्याने दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले.

आग विझविण्यासाठी रंगनाथ बिडवे, दादु जोंधळे, अशोक जोंधळे, भिमाशंकर जोंधळे, बिगुल भोसले, दिपक जोंधळे, राजेंद्र जोंधळे, योगेश भोसले यानीं शर्तीचे प्रयत्न केले.

शेती साहित्याच्या दुकानाला आग
राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com