कृषी कन्येने साधला सुपर नेपीअर ग्रास उत्पादक शेतकऱ्याशी संवाद

कृषी कन्येने साधला सुपर नेपीअर ग्रास उत्पादक शेतकऱ्याशी संवाद

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

कृषी महाविद्यालय पुणे (Agricultural College Pune) येथे कृषी पदवीचे शिक्षण (Agriculture Degree Education) घेत असलेल्या प्रतीक्षा सुरेश थोरात (Pratiksha Suresh Thorat) या कृषी कन्येने नेवासा (Newasa) तालुक्यातील कुकाणा (Kukana) येथील सुपर नेपीअर ग्रास उत्पादक (Super Napier Grass Producer) शेतकऱ्याशी संवाद (Farners Communication) साधून पीक लागवड पद्धती (Crop planting methods) व उत्पादनाचे तंत्र (Production technique) अभ्यासले आहे.

नेवासा (Newasa) तालुक्यातील तरवडी (Tarwadi) येथील प्रतीक्षा सुरेश थोरात ही विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालय पुणे येथे कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे. कार्यानुभव अभ्यासक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी, शेताच्या बांधावरील प्रात्यक्षिके अभ्यासली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिक्षाने महाविद्यालयाचे डॉ.एच.पी.सोनवणे ,केंद्र प्रमुख डॉ.डी. ए. सोनवणे, कार्यक्रम अधिकारी एस.व्ही.बगाडे यांचे मार्गदर्शना तरवडी येथील अशोक दरवडे या शेतकऱ्याची (Farmers) भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी शेतात केलेल्या सुपर नेपिअर ग्रास (Super Napier Grass Planting) लागवडीचे तंत्र व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा अभ्यास केला.यावेळी अजित मंडलिक, प्रशांत देशमुख, सुरेश थोरात, मयूर थोरात उपस्थित होते.

सुपर नेपिअर ग्रास लागवड पद्धत...

सुपर नेपिअर ग्रासच्या एका ताटापासून 18 ते 20 डोळे मिळतात.ऊसाचे लागवडी प्रमाणे 5 बाय 1 फूट अंतरावर एक डोळा पद्धतीने लागवड केली जाते. यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. एका वर्षात 4 ते 5 कापन्या होतात. एकरी 200 ते 250 मे. टन उत्पादन मिळते.

चारा व लागवडीसाठी विक्री..

सुपर नेपिअर ग्रास मध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक असल्याने जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो. त्याच बरोबर सीएनजी गॅस कंपन्याशी करार केला आहे.इतर शेतकऱ्यांना लागवडी साठी बेणे म्हणून ही पुरवठा केला जातो. एक डोळा एक रुपयाला विकला जातो. एका गुंठ्यांत 300 डोळे मिळतात.

याबाबत अधिक माहिती देतांना शेतकरी अशोक दरवडे म्हणाले, सुपर नेपिअर ग्रास लागवड शेतकऱ्यांसाठी ऊस पीका पेक्षाही फायदेशीर आहे. एक वर्षात या पिकाच्या 4 ते 5 कापण्या होतात. एकरी 200 ते 250 टन उत्पादन मिळते. बेणे विक्रीतून वर्षाला एकरी 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याच बरोबर स्वतःच्या गोठ्यातील 30 म्हशींना चारा सुद्धा मिळतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com