कृषी कायदे करताना ग्रामसभेचे मत विचारात घ्यावे

पद्मश्री पवार यांचे मत || ‘तो’ सभागृहाचा अपमान
कृषी कायदे करताना ग्रामसभेचे मत विचारात घ्यावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कायदे (Laws) रद्द करण्याआगोदर त्यातील त्रुटी काय आहे हे पाहिले पाहिजे. संसदेत (Parliament) पारीत झालेले कायदे त्या सभागृहांचे (Auditorium) यश असते. त्यातून त्या कायद्यांची अंमलबजावणी सुरू होते. परंतू, कृषी कायदे (Agricultural Laws) मागे घ्यावे लागणे हा निर्णय लोकशाही आणि संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान ठरणारा असेल असे मत पद्मश्री पोपटराव पवार (Padma Shri Popatrao Pawar) यांनी व्यक्त केले.

एका कार्यक्रमानिमित्त पद्मश्री पवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, भारतातील भौगोलिक परस्थिती, वातावरणातील बदल अशा विविध अंगाने विचार करून कृषी कायदे (Agricultural laws) करावे लागणार आहेत. यासाठी ग्रामसभा ते संसद (Gram Sabha to Parliament) अशा सर्व ठिकाणी चर्चा होऊन कृषी कायदे होणे गरजेचे आहे. देशात विविध राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. कुठे अतिवृष्टी, कुठे कमी पर्जन्यमान अशी परिस्थिती असते. एकीकडे कृषी अभ्यासक (Agricultural practitioner), कृषी तज्ज्ञ (Agricultural Expert) यांचा विचार आणि त्याचबरोबर ग्रामपातळीवर शेतकर्‍यांची अपेक्षा याची सांगड बसली पाहिजे.

त्यासाठी ग्रामसभा ते तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे, त्यानंतरच कायदे झाले पाहिजे. अन्यथा लोकशाहीच्या लोकसभा आणि सर्वोच्च अशा राज्यसभेत कायदे मंजूर होतात आणि पुढे त्याविरोधात नागरिक तीव्र आंदोलन करतात त्यातून सरकारला कायदे मागे घ्यावे लागतात हे बरोबर नाही. त्यासाठी कायदे करण्याअगोदर सर्वंकष विचार होणे गरजेचे आहे, म्हणजे सर्वोच्च सभागृहाचा अपमान होणार नाही, असे मत पद्मश्री पवार यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com