पेरूची फोड झाली गोड

पेरूची फोड झाली गोड

कर्जत |ता. प्रतिनिधी| Karjat

कृषी शिक्षण (Agricultural Education) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Student) ४० गुंठेमध्ये तब्बल पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळवले. शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आणि हे करताना पेरूची (Peru) फोड शेतकऱ्यांना देखील गोड करून दाखवली.

कर्जत तालुक्यातील (Karjat) नेटके वाडी येथील विशाल अंबर भोसले हा विद्यार्थी मिरजगाव येथील एका कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मात्र शिक्षण घेत असतानाच त्याने ४० गुंठे क्षेत्रामध्ये पेरूचे झाडे (Peru Trees) लावून पंधरा लाख रुपये उत्पादन (Production) घेत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती अपूर्ण पाणी यासह सातत्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पारंपरिक शेती, व पारंपारिक पीक पद्धती याच पद्धतीने शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करत आहे.

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पीक चांगले आले तर त्याला भाव मिळत नाही, भावा असेल तर पीक नाही आणि सर्व काही सुरळीत असेल तर अतिवृष्टी , किंवा दुष्काळाचा फटका ठरलेला.युवक विद्यार्थ्यांचे धाडसया सर्व पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत कृषी महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विशाल अंबर भोसले यांनी तालुक्यातील नेटके वाडी येथील त्याच्या स्वतःच्या शेतीमध्ये तैवान जातीची पेरू ची ४० गुंठे क्षेत्रामध्ये झाडे लावली. आणि त्यांनी कृषी महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीची शिक्षण घेतले त्या ज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने या पेरूच्या झाडांची लागवडीपासून सर्व शास्त्रीय पद्धतीचा वापर केला.

आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर केल्यामुळे अवघ्या कमी क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्याने तब्बल पंधरा लाख रुपयांचे उत्पादन घेतले. त्याच्या या वाटचालीमध्ये त्याचे वडील अंबर भोसले यांनी त्याला मोलाची साथ दिली तो राबवत असलेल्या या प्रकल्पाला त्यांनी त्याला पाठिंबा दिला. विशाल भोसले त्याने लावलेली पेरूची बाग पाहण्यासाठी कृषी महाविद्यालयातील त्याची सर्व शिक्षक, यांच्यासह अनेकांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com