वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई न थांबवल्यास उग्र आंदोलन

अनिल घनवट यांचा इशारा
अनिल घनवट
अनिल घनवट

श्रीगोंदा | प्रतिनिधी

शेतकर्‍यांकडील थकित वीज बिले वसूल करण्यासाठी, वीज वितरण कंपनीने शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु केलेली आहे. स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनने एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र सरकार शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल घेण्यास तयार नाही. सरकारने ही ताठर भूमिका न सोडल्या शुक्रवार पासून उग्र सवरुपाचे आंदोलन छेडेल असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी फेसबुक लाईव्ह व निवेदनाद्वारे दिला आहे.

सरकार शेतीमालाचे भाव पाडून शेतकर्‍यांना उणे अनुदान देते म्हणुन शेतकरी कर्ज व वीज बील भरू शकत नाही. वीज कंपनीने वाढीव बीले देऊन वीज ग्राहक व राज्य शासनाची ही फसवणूक केली आहे. अनुदानाच्या रकमे इतकी सुद्धा वीज शेतकर्‍यांना दिली जात नाही. शेतकरी वीज वितरण कंपनीचे देणेच लागत नाही. वीज कायद्यानुसार २३० ते २४० व्होल्ट दाबाने वीज पुरवठा करणे बंधन कारक आहे मात्र प्रत्यक्षात सासरी१५० व्होल्टनेच वीज पुरवठा केला जातो. कायद्यानुसार १५ दिवस आगाऊ नोटीस दिली जात नाही. शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात आहे. वीज पुरवठा खंडित करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा ही भंग होत आहे.

वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई त्वरित बंद करावी व शेतकर्‍यांच्या वरील मागण्यांचा विचार करावा यासाठी १ फेब्रुवारी पासून शांततेच्या मार्गाने सनदशीर आंदोलन सुरु आहे मात्र सरकार आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही. सरकार चर्चाही करण्यास तयार नाही व बेकायदेशीर कारवाया सुरूच आहेत.

शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी दुपारपर्यंत सरकारने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी व शेतकरी संघटना व वीज ग्राहक संघटनांना चर्चेसाठी निमंत्रित करून कायम स्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. तसे न केल्यास शुक्रवारी ४ वाजता राज्यभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करून धरणे आंदोलन स्थगित करण्यात येइल.

४ फेब्रुवारी नंतर ज्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला जाईल, त्या उपकेंद्राच्या प्रमुख अधिकार्‍याचा शेतकरी समाचार घेतील असे घनवट यांनी फेसबुक लाइव्ह मध्ये सांगितले व संबंधीत मंत्री व अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. राज्यभर धरणे आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे घनवट यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com