अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोव्हिड-19 तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या RT-PCR प्रयोगशाळेस कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे करोना रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

RT-PCR प्रयोगशाळेस जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधीची उपलब्धता झालेली आहे. ही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी 90 लाख रुपयांचा खर्चही झाला आहे. तसेच RT-PCR प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक व अतांत्रिक मुनष्यबळ राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पध्दतीने उपलब्ध करून घेण्यात आलेले आहे.

या प्रयोगशाळेची चाचण्या करण्याची क्षमता 560 प्रतिदिन आहे. त्यानुसार या प्रयोगशाळेस कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे.