अगस्ती कारखाना प्रभारी कार्यकारी संचालकपदी शेळके

अगस्ती कारखाना प्रभारी कार्यकारी संचालकपदी शेळके

घुले यांचा राजीनामा मंजूर

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा अखेर गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच घुले यांना कार्यकारी संचालक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

सध्या पूर्वहंगामी (प्रीसीझनल) कामे प्रगतीपथावर असल्याने या पदावर नवीन कार्यकारी संचालक नियुक्त होईपर्यंत अगस्ति कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथराव शेळके यांची प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारपासून कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी अलीकडेच आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल संचालक मंडळाने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. श्री. घुले हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाले आहेत. यापूर्वी ही 15 वर्ष त्यांनी तेथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेले होते.

याच बैठकीत श्री. शेळके यांचेकडे प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. श्री. शेळके हे अगस्ति कारखान्याच्या स्थापने पासून लेखापाल विभागात कार्यरत होते. सुरुवातीला लिपिक म्हणून त्यानंतर बोर्ड सचिव व मुख्य लेखापाल म्हणून ते काम पहात होते. अगस्ति पतसंस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून ही काही दिवस त्यांनी काम पाहिले. माजी मंत्री, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड, उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर, संचालक वैभवराव पिचड यांचेसह संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com