‘अगस्ति’चे यंदा 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट- पिचड

‘अगस्ति’चे यंदा 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट- पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति कारखाना हा 3500 मे.टन क्षमतेचा असून, कारखाना कार्यक्षेत्रात अंदाजे 4 ते 4.25 लाख मे.टन व कार्यक्षेत्राबाहेरील 2.00 लाख अशा प्रकारे मिळून सहा लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन अगस्ति कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी केले.

अगस्ति सहकारी साखर कारखान्याची 27 वार्षिक सर्वसाधारण सभा काल कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून पिचड बोलत होते. अहवाल सालातील दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी नोटीसचे वाचन केले. मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन कारखान्याचे बोर्ड सेक्रेटरी एकनाथ शेळके यांनी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर तसेच संचालक वैभव पिवड, प्रकाशराव मालुंजकर, मिनानाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, अशोकराव देशमुख, कचरपाटील शेटे, रामनाथ बापू वाकचौरे, अशोकराव आरोटे, राजेंद्र डावरे, मच्छिंद्र धुमाळ, महेशराव नवले, सुनील दातीर, भाऊसाहेब देशमुख, भास्कर बिन्नर, भीमसेन ताजणे, संचालिक सुरेखा देशमुख, मनीषा येवले व कार्यकारी संचालक अजित देशमुख आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी पिचड म्हणाले, ही सभा ऑफलाईन सर्व सभासदांसमोर घ्यावयाची होती. परंतु शासनाच्या धोरणानुसार व करोना या आजाराने कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाईन घ्यावी लागत आहे. याचे फार दु:ख होत आहे. मागील वर्षी उच्चांकी गाळप केले. हीच परंपरा आपल्याला पुढे चालु ठेवावयाची आहे. भंडारदरा धरणाचे पाणी वाटप केले, मुळा नदीला अनेक के.टी.वेअर बांधले, पिंपळगाव खांड धरण केले. प्रवरेत निळवंडे धरण केले. हक्काचे पाणी मिळाले.

निळवंडे धरणाला उच्चस्तरीय कॅनॉलची कल्पना मी मांडली. कल्पना मांडल्यामुळे अजितदादा पवार यांचे सहकार्याने ही कामे मार्गी लागली म्हणुन अगस्तिचे कार्यक्षेत्रात ऊस निर्माण झाला. अगस्तिच्या कार्यक्षेत्रात ऊस निर्माण झाला नसता तर शेतकर्‍यांना जास्त ऊस भाव देता आला नसता. मागील वर्षाचे राहिलेले संपूर्ण पेमेंट व दिपावलीची साखर सभासदांना देऊन त्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर यांनी 2020-21 चा संपूर्ण अहवाल मांडत असताना सन 2020-21 ची आर्थिक स्थिती, एकूण कर्जे, त्याची परतफेड तसेच आज अखेरची एकूण कर्जे व त्याची करावयाची परतफेडीची तपशिलवार माहिती मांडली. ऊस वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविलेल्या वेगवेगळया योजनांची माहिती दिली. मागील वर्षी कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांचे संपूर्ण उसाचे गाळप केले. याहीवर्षी कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळपाचे नियोजन केलेले आहे. मागील वर्षी गाळप झालेल्या उसाची एफ.आर.पी. शेतकर्‍यांना देणे बाकी आहे. तीही रक्कम आपण शेतकर्‍यांना लवकरच देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बी. जे. देशमुख, सुरेश नवले, शुभम आंबरे, शरद चौधरी, प्रदीप हासे, सुरेश हासे, सुनील वाळुंज, शांताराम धुमाळ, राजेंद्र भांगरे, मंडलिक, जालिंदर वाकचौरे, सुधाकरराव देशमुख, नानासाहेब वाकचौरे यांनी भाग घेतला. आभार कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे यांनी मानले आणि वंदेमातरमने सभेची सांगता झाली.

Related Stories

No stories found.