अगस्ति निवडणुकीसाठी ५२ अर्ज दाखल

पिचड पिता-पुत्र, गायकर यांचा समावेश
अगस्ति निवडणुकीसाठी ५२ अर्ज दाखल

अकोले (प्रतिनिधी)

अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दोन दिवसांत ५२ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल केलेल्यांमध्ये अगस्ति कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड, उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, माजी आमदार, विद्यमान संचालक वैभवराव पिचड यांच्यासह काही आजी माजी संचालक तसेच नवोदित कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन आवाहन केले असले तरी मोठ्या संख्यने अर्ज दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर असून सरळ लढत होते की तिरंगी लढत होते की चार पॅनल उभे राहतात यावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ-

मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, महिला राखीव गीता अनिल रहाणे, कुमुदिनी सदाशिव पोखरकर, बिगर उत्पादक/पणन संस्था प्रतिनिधी सीताराम गायकर, प्रतापराव देशमुख, इतर मागासवर्गीय भीमसेन ताजणे, गोरक्ष साबळे, मीनानाथ पांडे, विकास देशमुख

भटक्या विमुक्त जाती जमाती-

भास्कर दराडे, सुभाष काकड

सर्वसाधारण उत्पादक गट-

देवठाण गट-नामदेव उगले, रामनाथ बापू वाकचौरे, संतोष रामनाथ वाकचौरे, एकनाथ सहाणे, सुधीर शेळके,

आगार गट

विकासराव कचरू शेटे, आनंदा रामभाऊ वाकचौरे, सुनील सुखदेव कोटकर, मिनानाथ पांडे, किसन रेवजी शेटे, अरुण आरोटे, अशोक झुंबरराव आरोटे, परबत नाईकवाडी, सुधाकर आरोटे, बाळासाहेब घोडके,

कोतूळ गट-

सिताराम गायकर, हेमंत देशमुख, गोरक्ष साबळे, कैलास शेळके, राजेंद्र देशमुख,

इंदोरी -

मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, प्रकाश नवले, भाऊपाटील उर्फ प्रकाश मालुंजकर, ज्ञानेश्वर आरोटे, अशोक देशमुख, रोहिदास जाधव, भाऊसाहेब खरात, विकास देशमुख

अकोले गट-

माणिक देशमुख, भीमसेन ताजणे, अण्णासाहेब ढगे.

आज अखेर ३१३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि. २० जून आहे. दि. २१ जूनला अर्जाची छाननी होईल तर दि. २२ जून रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २२ जून ते ६ जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पहिल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या अर्जाची संख्या लक्षात घेता २१ जागांसाठी विक्रमी संख्यने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com