'अगस्ति'चे उद्याचे मतदान रद्द

या तारखेला होणार उच्च न्यायालयात सुनावणी
'अगस्ति'चे उद्याचे मतदान रद्द

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे (Agasti Cooperative Sugar Factory) उद्या रविवारी होणारे मतदान (Voting) आता होणार नाही. राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकींना (Election of Co-operative Societies) 30 सप्टेंबर पर्यंत स्थगिती (Adjourned) दिली आहे. शासनाच्या या निर्णया विरुद्ध शेतकरी समृद्धी मंडळाचे वतीने ज्येष्ठ नेते, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर, अगस्ति कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाशराव मालुंजकर, परबतराव नाईकवाडी, माजी संचालक अशोकराव देशमुख, उमेदवार विकास शेटे आदींनी उच्च नायालयाच्या खंडपीठात (High Court Benches) शासन निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.

'अगस्ति'चे उद्याचे मतदान रद्द
श्रीरामपूर आगाराची नाऊर-रामपूर बस अडकली महावितरणच्या तारेत

मात्र त्यासंदर्भात आज कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यासंदर्भात 25 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवन्यात आली आहे. आता 25 जुलै रोजीच निवडणूक संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com