महागाई विरोधात नगरमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

महागाई विरोधात नगरमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या 9Petrol, diesel and domestic LPG) विक्रमी दरवाढीने (record price increases)सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) वतीने केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या निषेधार्थ (Central Modi and BJP Government protest) शहरातील जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची (Movement) सुरुवात करण्यात आली. महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध (Central government's protest against inflation) नोंदविण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते (Manikrao Vidhate), राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, केडगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत गारुडकर, शहर उपाध्यक्ष अमोल कांडेकर, जॉय लोखंडे, नितीन लिगडे, सुनिता पाचरणे, लता गायकवाड, साधना बोरुडे, उषा सोनटक्के, लंकेश चितळकर आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), घरगुती एलपीजी गॅसचे (Domestic LPG Gas) दर वाढवून संपुर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. 2014 पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने (BJP Government) महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात महागाई करुन ठेवली आले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. इंधनवर केंद्र सरकारने विविध कर लादल्याने (central government has imposed various taxes on fuel) महागाई कमी होण्यास तयार नाही. यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असल्याचे राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने स्पष्ट करण्यात आले.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. जनतेची दिशाभूल करुन केंद्र सरकारने जीवनावश्यक इंधनची दरवाढ करुन महागाई वाढवली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठिण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com