महागाईविरोधात बैलगाडी रॅली

केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन
महागाईविरोधात बैलगाडी रॅली

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

केंद्रातील भाजप सरकारने (Central BJP Government) ‘अच्छे दिन आने वाले है’चा नारा देत सत्ता मिळविली. पण महागाई वाढवून करोना संकट काळात लोकांची चेष्टा केली. त्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसतर्फे बैलगाडी रॅली काढून अनोखे आंदोलन केले.

तुळशीदास मंगल कार्यालय येथून बैलगाडी रॅलीस प्रारंभ झाला. नंतर तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवसेनेने रॅलीस पाठिंबा दिला. यावेळी प्रशांत ओगले म्हणाले की, केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गोरख बायकर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मेहेत्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, वडाळीचे सरपंच महेश दरेकर, संदीप उमाप, संदीप वागस्कर, नितीन खेडकर, प्रशांत सिदनकर, पवन मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com