नेवासा शहरात पुन्हा लॉकडाऊन ?

नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन...
नेवासा शहरात पुन्हा लॉकडाऊन ?

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

शहरात सुरू असलेल्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन काही नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे केले आहे.

मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते मात्र आता रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत असून गुरुवारी २१ कैद्यांसह पाच पोलीस कर्मचारी करोना बाधीत आढळल्यानंतर शुक्रवारी ही शहरातील एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आला आहे.

नेवासा शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली असून शुक्रवारी दुपारनंतर शहरातील अनेक नगरसेवकांनी

नेवासा शहरातील नागरिकांना काम असेल तरच बाहेर पडा, तोंडाला मास्क लावा, व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा नेवासा शहर बंद करण्याची वेळ आपल्यावर ओढवणार असल्याचा दावा सोशल मिडियाद्वारे केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com