तीन वर्षानंतर अखेर गुरूजींच्या बदल्यांना सुरूवात

299 शिक्षकांच्या बदल्या पूर्ण
तीन वर्षानंतर अखेर गुरूजींच्या बदल्यांना सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी)

आधीचे दोन वर्षे करोना आणि त्यानंतर मागील वर्षी बदल्यांसाठीचे ऑनलाईन सॉफ्टरवेअर निर्मिती यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षापासून मुहूर्त मिळाला नव्हता. मात्र, शुक्रवार (दि.30) गुरुजींसाठी शुभवार ठरला असून ग्रामविकास विभागाच्या नियोजनानूसार पहिल्या टप्प्यातील संवर्ग एकमधील 299 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

दरम्यान शुक्रवारपासून (काल) संवर्ग दोनमधील शिक्षकांना आता बदलीसाठी 30 शाळांचे पर्याय ऑनलाईन सॉफ्टरवेअरमध्ये भरावी लागणर आहेत. यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत असून त्यानंतर संवर्ग एकप्रमाणे संवर्ग दोनच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात 1 हजरी 154 प्राथमिक बदल्यांसाठी पात्र होते. यात बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या ही 793 होती. विशेष संवर्ग भागमध्ये 1 हजार 469 शिक्षक आणि संवर्ग भागमध्ये 216 शिक्षकांचा समावेश होता.

बदली पात्रमधून शुक्रवारी संवर्ग एकमधील 299 शिक्षकांच्या बदल्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ऑनलाईन प्राप्त झालेले आहेत. या संवर्गात दुर्गध आजाराने पीडित, अपंग शिक्षक, 53 वर्षापेक्षा जास्त वय असणारे शिक्षक, विधवा, घटस्फोटीत शिक्षकांचा समावेश आहे. तर संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण होणार आहे. दुसरीकडे संवर्ग एकमधील 299 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असली तरी बदलीचे आदेश एकत्रित संवर्ग एक ते चारच्या बदल्या झाल्यानंतरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर तालुक्यात 60 शिक्षकांच्या बदल्या

संवर्ग एकमध्ये शुक्रवारी झालेल्या बदल्यामध्ये नगर तालुक्यात 60 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यात 30 शिक्षकांच्या तालुकातंर्गत बदल्या झालेल्या असून उर्वरित 30 शिक्षक हे तालुक्यातून बाहेर पडत सोयीच्या ठिकाणी बदलून गेलेले आहे. शिक्षकांच्या बदल्यामध्ये नगर आणि पारनेर तालुक्यातील बदल्या हा चांगलाच हॉट विषय असतो.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com