विकेंड लॉकडाऊननंतर नगरकर रस्त्यावर !

विकेंड लॉकडाऊननंतर नगरकर रस्त्यावर !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन शिस्तीने पाळणारे नगरकरांना आज सोमवारी मात्र कोरोनाचा विसर पडला.

राज्यात लॉकडाऊन लागण्याच्या संकेतामुळे गर्दीसाठी शहर आणि उपनगरात खरेदीसाठी गर्दी लोटली.

नगरकरांच्या गर्दीने कोरोनाचे नियमही पायदळी तुडविले. उद्या पाडवा असल्याने खरेदीसाठी नगरकर रस्त्यावर उतरले. मास्क, सोशल डिस्ंटन्सिंग या नियमाला तिलांजली देत नगरकरांकडून कोरोनाला आमंत्रण दिले गेले.

दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असताना नगरच्या रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. नगरकरांनीही स्वत:ला घरात कोंडून घेतले. आज मात्र विकेंड संपताच नगरकरांनी किराणा, भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी गर्दी केली.

सोमवारी सकाळीच पाईपलाईन रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, भिंगार, केडगाव, चितळे रोड, माळीवाडा, मार्केट यार्ड भागात झालेल्या गर्दीत कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

नगर जिल्ह्यात कोरोना पेशंटने आठवडाभरापासून दोन हजाराचा टप्पा गाठला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 12 हजाराच्या घरात पोहचली आहे. एकीकडे रुग्णवाढीचा वेग आणि दुसरीकडे बेफिकीरी दिसून आली. त्यामुळे कोरोना रोखणार तरी कसा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com