अफगाणिस्तानातील मुस्लिम धर्मगुरू हत्याकांडातील मारेकरी राहुरीत जेरबंद

येवला येथे घडली होती घटना ? || गावठी कट्टयासह जिवंत काडतुसे केले पोलिसांनी हस्तगत
सुफी
सुफी

राहुरी |ता. प्रतिनिधी| Rahuri

अफगाणिस्तानातील सुफी मुस्लिम धर्मगुरूच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला बुधवारी रात्री एका हॉटेलवर राहुरी पोलिसांनी झडप घालून त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्यासह पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय 27 रा. समतानगर कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26 रा.चवडी जळगाव ता. मालेगाव), विशाल सदानंद पिंगळे (वय 23 रा. कोपरगाव) असे पकडलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

सुफी
बेकायदा औषधसाठा प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

बुधवारी कारवाई आटोपून जेवण करण्यासाठी राहुरी पोलीस घरी निघाले असता तोच पोलीस अधिकारी सज्जन नार्‍हेटा यांना नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जावर गावठी कट्यासह सराईत आरोपी जेवण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नार्‍हेटा यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांना घटनेची खबर दिली.

सुफी
संगमनेर येथील नामांकित रुग्णालयातील व्यवस्थापकाकडून महिलेचा विनयभंग

त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा या हॉटेलकडे वळवला. राञी 10 वाजण्याच्या सुमारास हॉटेल सर्जावर जेवण करण्यासाठी बसलेल्या आरोपींवर पोलिसांनी झडप मारली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे देखील आढळून आले. हा संपूर्ण थरार हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांनी बघितल्यानंतर एकच दाणादाण उडाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेटा हे करत आहेत.

सुफी
शिक्षकच करतो मुलींशी अश्लिल वर्तन

नाशिक जिल्ह्यातील येवला हद्दीत अफगाणिस्तान येथील मुस्लिम सुफी धर्मगुरुची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी संतोष हरिभाऊ ब्राह्मणे हा राज्य गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक तसेच नाशिक पोलीसांच्या रडारवर होता. याबाबत राज्य तपास यंत्रणा कसुन शोध घेत होती. मात्र तो मिळून येत नव्हता. याबाबत आणखी नवीन माहिती हाती येण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com