वकिलास जीवे मारण्याची धमकी; चौघांविरूध्द गुन्हा

वकिलास जीवे मारण्याची धमकी; चौघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी अ‍ॅड.ज्ञानेश्वर राधाकृष्ण फटांगरे (वय 31 रा. बागरोजा हाडको, दिल्लीगेट) यांना चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी दुपारी आयुर्वेद कॉर्नर चौक जवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी अ‍ॅड. फटांगरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रविवारी दुपारी दुचाकीवर मित्रासह मार्केटयार्डकडून आयुर्वेद चौकाकडे जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांच्यासमोर वाहन उभे केले. वाहनाची काच खाली करून फिर्यादी यांना,‘तू अ‍ॅड.एम.डी.पवार व सागर पवार यांच्याविरूध्द दाखल केलेली केस कोर्टातून मागे घे, नाहीतर तुला दोन वेळेस सोडले आहे, आता तुला गायब करून टाकू’, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवी टकले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com