दुधात 'अशी' करायचा भेसळ; अकोलेत छापा टाकून केला पर्दाफाश

अन्न-औषध विभाग व अकोले पोलिसांची संयुक्त कारवाई
दुधात 'अशी' करायचा भेसळ; अकोलेत छापा टाकून केला पर्दाफाश

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील जांभळे येथील दुध संकलन करणाऱ्या योगेश चव्हाण यास दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असतांना रंगेहात पकडले आहे.

अहमदनगर येथील अन्न व औषध सुरक्षा विभागाने छापा टाकून १५ गोणी पावडर व तेल ड्रम आदी साठा हस्तगत केला आहे. यामुळे दूध भेसळ प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे त्याचे पथक व अकोले प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी बी हांडोरे यांच्या सयुंक्त पथकाने अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याचे खबरीवरुन चव्हाण याचे घरी आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता छापा मारला. तेथे दुधामध्ये भेसळ करण्यासाठीची १५ गोणी पावडर, तेल ड्रम सह साहित्य मिळून आले.

दुधात 'अशी' करायचा भेसळ; अकोलेत छापा टाकून केला पर्दाफाश
साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक; काय आहे प्रकरण?

तेथील ४० लिटर दुधातून सॅपल घेतले, तसेच तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास १ हजार लिटर दुध नष्ट केले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारीनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅपल तपासणीसाठी घेऊन गेले. या सॅपलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली.

या कारवाई वेळी अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे, पवार, सुर्यवंशी, साैरभ व पोलिस सपोनी मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी.बी.हांडोरे,पो.कॅा.बढे, पो.ना.गणेश शिंदे, विठ्ठल शरमाळे, क्षीरसागर, वलवे. पोलिस वाहन चालक मोरे हे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com