श्रीरामपूर पोलिसांनी भुकटीची पाकिटे भरलेला टेम्पो पकडला

श्रीरामपूर पोलिसांनी भुकटीची पाकिटे भरलेला टेम्पो पकडला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या संशयावरून 59 भुकटीची पाकीटे भरलेला टेम्पो शहर पोलिसांनी सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास येथील अशोक टॉकीज परिसरात (प्रभाग सात) पकडला.

घटनास्थळी दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्यावेळी वाद झाल्याने एकाने वादाची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथून पोलिसांनी एका टेम्पोसह 25 किलो वजनाच्या दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या संशयावरून 59 भुकटीची पाकीटे ताब्यात घेतली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला रात्रीच माहिती देत पोलीस ठाण्यात नोंद केली. याबाबत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभरात अन्न आणि औषध तपासणी पथकाला पोलिसांकडून तीन ते चार वेळा निरोप पाठविण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईसाठी अन्न आणि औषध तपासणी पथकाकडून तत्परता दाखवली नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com