
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 14 गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे 21 कोटी 22 लाख 40 हजार रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील चिंचोली 4 कोटी 80 लाख 22 हजार रुपये, कोल्हार खु. 4 कोटी 83 लाख 67 हजार रुपये, मल्हारवाडी 91 लाख रुपये, घोरपडवाडी 49 लाख रुपये, कानडगाव 1 कोटी 67 लाख, वावरथ 1 कोटी 73 लाख 97 हजार रुपये, निंभेंरे 1 कोटी 19 लाख रुपये, तुळापूर 54 लाख रुपये, चिंचविहीरे 76 लाख रुपये, गणेगाव 1 कोटी 2 लाख रुपये, चांदेगांव 1 कोटी 19 लाख रुपये, राहुरी खुर्द 65 लाख रुपये, देसवंडी 71 लाख 91 हजार रुपये, शिलेगाव 70 लाख 63 हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
लवकरच जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातील 11 गावांसाठी 7 कोटी 82 लाख तसेच ब्राम्हणी व 7 गावांकरिता 53 कोटी 86 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते, वीज, पाणी, तलाव दुरुस्ती आदी कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत वीज, रस्त्याच्या व पिण्याच्या पाणी योजना कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले.