चांदा ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे
सार्वमत

चांदा ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेवासा पंचायत समितीचे अधिकारी संतोष कदम यांनी आज कार्यभार स्विकारला.

Nilesh Jadhav

चांदा | वार्ताहर | Chanda

नेवासा तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या व राजकारणात जागृत गाव म्हणून ओळख असलेल्या चांदा गावच्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेवासा पंचायत समितीचे अधिकारी संतोष कदम यांनी आज कार्यभार स्विकारला.

गावातील सर्वाच्या अडचणीचे निवारण करतानाच सर्वानाच सोबत घेऊन गावातील विकासात्मक कामाला गती देणार आहे त्याचबरोबर प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त प्रशासक संतोष कदम यांनी केले आहे

चांदा ग्रामपंचायत पदाधिकारी मुदत काल २० ऑगस्ट रोजी संपली होती. करोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्याने ग्रामपंचायतीवर शासनाकडून कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी श्री. कदम यांनी पदभार स्विकारला. त्यांचा सन्मान कार्यक्रम मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मावळत्या सरपंच सौ. अरूणा रोहिदास थोरात याचा तसेच कार्यकाल पुर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशासक म्हणून नेमणुक झाल्याबद्द्ल संतोष कदम यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती कारभारी जावळे, माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे, माजी सरपंच संजय भगत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी भेंडा कारखान्याचे संचालक मोहन भगत, मुळा कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी , कैलास दहातोंडे, माजी सरपंच भाऊसाहेब जावळे, ज्ञानदेव दहातोंडे, शिवाजी दहातोंडे, सुभाष शिंदे, नारायण दहातोंडे, सादिक शेख,आप्पासाहेब गायकवाड, संतोष गाढवे रोहिदास थोरातआदि उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी रजनिकांत मोटे यांनी मानले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com