कोपरगाव (प्रतिनिधी) -

तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली असल्याची

माहिती तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदिप पोखर्णा,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय विविध खात्यांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचेशी करोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहे.

तहसिलदार योगेश चंद्रे यांचे दालनात व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे जिल्हा प्रशासनाकडून संवाद साधण्यात आला आहे.या बैठकाला गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी व निमसरकारी कार्यालयात नो मास्क-नो एन्ट्री सक्तीने करण्यात येणार असून ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी करोना संसर्ग प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याची सुचना केली आहे.

तालुक्यात करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे पालन प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झाली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार कारवाईस पात्र राहतील.तरी तालुक्यातील नागरिकांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरील आदेश व नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे.