VIDEO : गद्दार हे गद्दारच असतात!; नेवाशात आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली

नेवासा | प्रतिनिधी

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना (Maharashtra Political Crisis) चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळल्यानंतर शिदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

पण अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. या प्रकरणावरुन न्यायालयीन लढाई सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोरावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) वारंवार निशाणा साधत आहेत.

आज (शनिवार) आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा (Shivsanvad Yatra) नेवाशात झाली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ‘गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचे नाव कितीही बदलले, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून कधीच पुसला जाणार नाही.’, अशी सडसून आदित्य ठाकरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com