आढळा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला

आढळा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) तालुक्यातील केळी -रुम्हणवाडी येथे आढळा नदीत (Adhala River) पोहायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह (Youth Dead Body) अथक परिश्रमा नंतर दोन दिवसांनी सापडण्यात पोलीस (Police) आणि नातेवाईकांना यश मिळाले आहे. 

आढळा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला
मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला

सिन्नर (Sinner) तालुक्यातील दोडी येथील गरीब कुटुंबातील दत्तू मोरे हा तरुण वीटभट्टीवर काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, रविवारी तो आढळा नदीत (Adhala River) पोहण्यास उतरला होता. अंगातील सदरा काढली आणि जिन्स विजारच त्याने पाण्यात डुबकी घेतली.

आढळा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला
शून्य ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची होणार आरोग्य तपासणी

त्यावेळी त्याचा पाय विजारीत अडकल्याने तो 20 ते 25 फूट खोल पाण्यात राहिला. अखेर श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अकोले पोलीस (Akole Police) , स्थानिक नातेवाईक आणि बाहेरुन पाचारण करण्यात आलेले पथक परिश्रम घेत होते.

आढळा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला
मुळानदी पात्रातून वाळू तस्करी

शेवटी स्थानिक तरुण अमोल मेंगाळ व हर्षल मेंगाळ यांनी गळ टाकून 48 तासांच्या अथक शोधकार्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. या गरीब तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आढळा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला
स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com