आढळा धरण ९० टक्के भरले
सार्वमत

आढळा धरण ९० टक्के भरले

रविवारी ओहरफ्लो होणार

Arvind Arkhade

देवठाण |वार्ताहर| Devthan -

अकोले तालुक्यातील देवठाण येथील १०६० द.ल.घ.फु क्षमता असलेले आढळा धरण शुक्रवारी रात्री ९७५ दलघफू भरले आहे.

सांडपात्रात पाणी दाखल झाले असून रविवारी धरण भरून वाहू लागणार इतकी पाण्याची आवक चालू आहे.

अकोले,संगमनेर व सिन्नर या तीन तालुक्यातील पंधरा गावातील शेतीसाठी याच धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो त्यामुळे धरण कधी भरणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com