आढळा धरण निम्मे भरले
सार्वमत

आढळा धरण निम्मे भरले

Arvind Arkhade

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 15 गावांच्या 3914 हेक्टर लाभक्षेत्राचे सिंचन करणारे आढळा धरण मंगळवारी सायंकाळी 6 वा निम्मे भरल्याची माहिती जलसंपदाचे अभियंता अभिषेक पवार यांनी दिली. दरम्यान, भंडारदरा धरणाचा जलसाठा 37.47 टक्के होता.

1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या आढळा धरणात सद्यस्थितीला 527 दलघफू पाणीसाठा आहे. मागील वर्षी 4 ऑगस्ट रोजी पूर्णत्वाने भरलेल्या आढळा धरणात यावर्षीच्या मर्यादित पावसाने भरलेल्या आढळा धरणात यावर्षीच्या मर्यादित पावसाने आतापर्यंत 50 टक्के पाणीसाठा झाला.

पावसाळा सुरु होण्यापुर्वी शिल्लक 380 दलघफू पाण्यात आतापर्यंत नवीन 147 दलघफू पाण्याची आवक झाली.धरण यावर्षीही स्वातंत्र्य दिनापुर्वी पुर्ण क्षमतेने भरण्याच्या लाभक्षेत्राच्या आशा मात्र अजूनतरी स्वप्नवत आहेत. पाणलोट क्षेत्रातून सद्यस्थितीला धरणात 110 क्युसेक्सने पाणी आवक सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com