जिल्ह्यात नव्या ४१ रुग्णांची भर
सार्वमत

जिल्ह्यात नव्या ४१ रुग्णांची भर

जिल्ह्यात सध्या ३००९ रुग्णावर उपचार सुरू

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३००९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१, नगर ग्रामीण ०७, कँटोन्मेंट ०४, पारनेर ०५, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com