सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीने कुटुंबियांसह घेतले शनी दर्शन

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीने कुटुंबियांसह घेतले शनी दर्शन

सोनई |प्रतिनिधी| Sonai

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी आपल्या कुटुंबियांसह शनी शिंगणापूर येथे येऊन शनी दर्शन घेऊन शनी पूजा केली . त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढण्यासाठी शनी भक्तांनी गर्दी केली होती .

उदासीमहाराज मठात शनी अभिषेक केला व चवथऱ्याखालून दर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा सन्मान केला. यावेळी बोलतांना शिल्पा शेट्टी म्हणाल्या की आमचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून शनी दर्शनाला येत असतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे आमचे येणे झाले नाही. शनी महाराजांवर आमच्या कुटुंबाची नितांत श्रध्दा असून दर्शन झाल्यावर मोठे समाधान लाभते व ऊर्जा मिळते असे म्हणाल्या.

शिल्पा शेट्टी यांनी 4 वर्षांपूर्वी यशवंत सामाजिक प्रतिष्टानच्या नेत्रदान संकल्पात नेत्रदानाचा संकल्प केला होता. मंदिर परिसरात शिल्पा शेट्टी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली असता त्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, अ‍ॅड. सतीश पालवे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com