बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन साईचरणी लीन

साईबाबा काही न मागता...
बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन साईचरणी लीन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा काही न मागता देतात. मलाही त्यांनी भरभरून दिलं आहे. मला व माझ्या कुटुंबाला साईबाबांच्या (Sai Baba) चमत्काराची अनुभूती अनेक वेळा आली आहे. बाबा अनेकदा कोणत्याही मार्गाने धावून येतात हे आपण व मम्मी, पाप्पांनी अनुभवले आहे. आज आपण जो श्वास घेतो, जे चैतन्य आहे. तेही बाबांचाच एक चमत्कार आहे, असे सांगत आपण बाबांकडे आज काही मागितले नाही. मात्र बाबांनी जे आत्तापर्यंत दिले त्यासाठीच बाबांचे उपकार म्हणून दर्शनाला आले आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Actress Raveena Tandon) यांनी व्यक्त केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन साईचरणी लीन
भाजपच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ना. विखे तर आ. थोरातांचाही प्रयत्न; कोणी केला दावा ?

प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन (Actress Raveena Tandon) या मंगळवारी शिर्डीला (Shirdi) आपल्या परिवारासह येऊन त्यांनी श्री साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. दुपारची मध्यान आरतीही त्यांनी केली. यावेळी साई संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. रविना टंडन यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, श्री साईबाबांच्या दर्शनाने (Sai Baba Darshan) व आरतीने आपण प्रसन्न झालो आहोत. आपण लहानपणापासूनच शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला येतो. बाबांनी जे काही दिले त्यासाठीच त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपण दर्शनाला येत असतो.

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन साईचरणी लीन
नाशिक पदवीधरसाठी 16 उमेदवार रिंगणात

कारण साईबाबाच कोणत्याही संकटात ते दूर करण्याची ताकद देत असतात. म्हणून त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी आपण शिर्डीला दर्शनाला येत असून आपले आगामी दोन-तीन चित्रपट (Film) येणार आहे. आपलं करिअरही श्री साईबाबांच्या आशीर्वादावरच अवलंबून आहे, असे सांगत त्यांनी आपली मुलगी बारावीला असल्यामुळे आली नाही. मात्र तिला यश मिळो, अशी साईचरणी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे आपल्या स्वर्गीय वडिलांना बाबा शेजारीच आश्रय मिळू दे, असेही आपण बाबांना बोललो. असे रविना टंडन (Actress Raveena Tandon) यावेळी म्हणाल्या. रविना टंडन आल्याचे समजताच चाहत्यांनी प्रवेशद्वारासमोर त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन साईचरणी लीन
माळीवाडा बसस्थानकात तीन अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले! पण...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com