राज्यात अवैध गौण खनिज विरोधात कारवाई सुरुच राहील

महसुलमंत्री ना. विखे पाटील यांचा इशारा
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता |प्रतिनिधी| Rahata

अवैध धंद्यांविरोधात (Illegal Occupations) कारवाई व्हावी ही सामान्य माणसाचीच इच्छा होती. अवैध गौण खनीज (Illegal Minor Minerals)आणि बेकायदेशिर वाळू उत्खननाबाबत (Illegal Sand Mining) सरकारने सुरु केलेल्या करवाईमुळे यासर्व बेकायदेशिर व्यवसायाला मोठा लगाम बसणार आहे. शासनाचे दायित्व बुडवून सुरु असलेला हा व्यवसाय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का? असा सवाल करुन, राज्यात या अवैध उत्खनना विरोधात कारवाई सुरुच राहील, असा स्पष्ट इशारा (Hint) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
जानेवारीमध्ये नगर-मनमाड महामार्गाच्या कामास प्रारंभ

माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, अवैध गौण खनीज उत्खनन (Illegal Minor Mineral Mining) आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्यात कारवाई सुरु आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्यक्ती आणि पक्षा विरोधात नाही, परंतु त्यांना वाईट वाटणे स्वभाविक आहे. आजपर्यंत राजकीय दबावापायी कारवाया होत नव्हत्या. प्रशासनाने सुध्दा या अवैध धंद्याकडे डोळेझाक केली होती. प्रशासन सर्व गोष्टी सहन करीत होते. सरकारचे अब्जावधी रुपयांचे दायित्व बुडविले जात होते. महसूल खात्यातील अनेक अधिकार्‍यांवर या माफीयांकडून हल्ले झाले. त्यांना जीवे मारण्याचे प्रकार घडले. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. या सर्व बेकायदेशिर उत्खननाविरोधात सरकारची कारवाई सुरुच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आदिवासी विद्यार्थी मारहाण प्रकरणी शिरपुंजे आश्रमशाळेतील अधीक्षकावर निलंबनाची कारवाई

सरकारने सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात अनेक जण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत याचा तरी खुलासा त्यांनी करावा. अवैध उत्खनन करणार्‍यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का ,असा सवाल करुन ना. विखे पाटील म्हणाले, सरकारने सुरु केलेल्या कारवाईचे या सर्वांनी खरेतर समर्थन केले पाहिजे. गौण खनिजाच्या कारणामुळे एकही सरकारी काम बंद पडणार नाही. निळवंडे कालव्यांच्या कामासाठी गौण खनिज उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व सूचना व आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत. गौण खनिज उपलब्धतेबाबत सर्व अधिकार प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले असून राज्यात गौण खनिज आणि वाळू संदर्भात सरकार लवकरच धोरण आणून या सर्व व्यवसायामध्ये पारदर्शकपणा कसा येईल, असा प्रयत्न करीत असल्याचे मंत्री विखे पाटील सांगितले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
अवैध गौण खनिजाबद्दल शासकीय सेवकांवर कारवाईची तरतूद करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी लम्पी आजारासंदर्भात केलेल्या टिकेची खिल्ली उडविताना मंत्री विखे पाटील म्हणाले, बेछुट आरोप करणे आणि प्रसिध्दीच्या झोतात राहणे हा नाना पटोलेंचा स्वभावच आहे. याला लम्पी आजार तरी काय करणार, सरकारने लम्पी आजाराच्या संदर्भात प्रभावीपणे काम केल्यामुळेच राज्यात पशुधन वाचविण्यात यश आले आहे. याची आकडेवारी नाना पटोलेंकडे (Congress State President Nana Patole) पाठविण्याची माझी तयारी आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पशुधन अधिकार्‍यांवर हल्ला झालेल्या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारचे हल्ले होणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर : 57 स्टोन क्रेशर व खाणपट्टाधारकांना तब्बल 765 कोटींचा दंड

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com