कामचुकार अधिकारी-कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

महापौर, उपमहापौरांनी घेतली घनकचरा विभागाची बैठक
कामचुकार अधिकारी-कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना कामाचा मोबदला दिला जातो. यामुळे त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडून नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करावी, आम्ही कोणालाही बळजबरीने नहाक त्रास देण्याचे काम करत नाही,

यापुढील काळात प्रत्येकाने चांगले काम करून स्वच्छ, सुंदर शहर ठेवण्याचे काम करावे, अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळ पडल्यास निलंबित केले जाईल, यासाठी सर्वांनी कामकाजात सुधारणा करून महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) कारभारात शिस्त लागेल असे काम करावे अशी तंबी नूतन महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) आणि उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale )यांनी दिली.

महापौर शेंडगे, उपमहापौर भोसले यांनी मंगळवारी घनकचरा विभागाची बैठक घेतली. यात शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसत आहेत. पूर्वी कचरा उचलल्यानंतर प्रत्येक प्रभागाप्रमाणे निर्जंतुकीकरण पावडर मारली जात होती. आत ती मारली जात नाही, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे.तसेच चिकन, मटनचे वेस्टेज रस्त्याच्या, तसेच ओढ्या-नाल्याच्या बाजूला फेकले जाते.

त्यामुळे कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढला आहे. याबाबत उपाययोजना कराव्यात, पावसाळा सुरू झाला असून शहरातील काही भागात नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसते. त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक प्रश्‍नांबरोबरच आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. याचबरोबर साथीचे रोगही येतात. यासाठी उपाययोजना कराव्यात आपण केलेले काम नागरिकांना दिसले पाहिजे. अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या घनकचरा विभागातील कामाकडे लक्ष द्यावे, घनकचरा विभागातील प्रत्येक कर्मचार्‍याने गणवेश व ओळखपत्रामध्ये कामावर यावे अशा सूचना घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना उपमहापौर भोसले यांनी दिल्या.

आढावा बैठकीला उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर, घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ. शंकर शेडाळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक सचिन शिंदे, निखिल वारे, सचिन जाधव,बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगर शहरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी थोड्याप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका आरोग्य विभागाने करोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करून घ्यावी जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. शहरातील रुग्ण संख्या शून्य कशी होईल यावर लक्ष केंद्रित करावे, तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com