नेवाशात सकाळी 11 नंतर सुरु असलेल्या तीन दुकानांवर कारवाई

नेवाशात सकाळी 11 नंतर सुरु असलेल्या तीन दुकानांवर कारवाई

नेवासा (तालुका वार्ताहर) - नेवासा शहरात सकाळी 11 वाजल्यानंतरही सुरु असलेल्या तीन दुकानांवर नगरपंचायत व शहर पोलीस ठाण्याच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, नेवासा नगरपंचायत व शहर पोलीस ठाण्याच्यावतीने नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांसमवेत सकाळी 11 वाजता दुकाने बाजार, अस्थापना बंद करण्याकरीता फेरी काढली असता नगरपंचायत चौकातील इम्तियाज आतार यांचे कोहिनूर ट्रेडर्स, एसटी स्टॅण्डसमोरील शुभम शूज, श्रीरामपूर रोडवरील सुरज मशिनरी ही दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आले.

या तीनही दुकानाच्या मालकांवर प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. दरम्यान तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांनी फळविक्री, भाजीपाला, किराणा, मासे-मटन आदी दुकाने केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवावीत व इतर दुकाने, अस्थापना पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवावेत असे आवाहन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com